News Flash

आमिर खानच्या ऑफीससमोर चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आमिरला भेटण्यासाठी हा चाहता बेळगावहून आला होता.

आमिर खान

अभिनेता आमिर खानच्या मुंबईतील ऑफीसबाहेर एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद कासिम असं त्या व्यक्तीचं नाव असून आमिरला भेटता न आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. आमिरची भेट घेण्यासाठी हा चाहता बेळगावहून आला होता. सुरक्षारक्षकांनी त्याला भेटू दिले नाही म्हणून मोहम्मदने त्याच्या खिशातली एक बाटली काढून विषजन्य द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकांनी ३३ वर्षीय मोहम्मदला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहम्मदने स्पष्ट केलं की, गेल्या अनेक दिवसांपासून त्याला आमिर खानला भेटायचं होतं. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही तो आमिरपर्यंत पोहोचू शकला नाही. पोलिसांनी मोहम्मदच्या कुटुंबीयांना या सर्व घटनेबद्दल कळवले आणि त्यांच्याकडे सुपूर्द केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 5:09 pm

Web Title: aamir khan fan attempts suicide outside aamir khans office
Next Stories
1 पत्नीला खूश करण्यासाठी रितेशची नवी हेअरस्टाइल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2 Photo : लहानग्या तैमुरचा टॅटू पाहिलात का ?
3 हृतिकने घेतली अ‍ॅक्शन स्टार ‘जॅकी चॅन’ यांची भेट
Just Now!
X