01 March 2021

News Flash

शाहरूखच्या भेटीची आमिरनं केली अक्षरश: माती

शाहरुखच्या या खास भेटीकडे आमिरने ढुंकूनही पाहिले नाही

शाहरुख खान व आमिर खान बॉलिवुड सिनेसृष्टीतील सुपरस्टार कलाकार म्हणून ओळखले जातात. मोठ्या पडद्यावर एकमेकांचे स्पर्धक असलेले हे सुपरस्टार खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांचे खुप चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये चांगले संबंध नसल्याचं व त्यांच्यातून विस्तवही जात नसल्याच्या कथा प्रसारमाध्यमांमध्ये येत राहिल्या. मात्र, दोघांनी याचा सातत्यानं इन्कार केला. खरंतर, त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से दोघांनीही अनेक कार्यक्रमांतुन सांगितले आहेत. आता एका नुकताच एक व्हिडीयो समोर आलाय ज्यामध्ये शाहरुख बरोबर घडलेला असाच एक मजेदार किस्सा आमिरने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सांगितला. आणि यावरून दोघांमध्ये खरंच जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे जाणवतं.

आमिरनं हा एक जुना किस्सा सांगितलाय. १९९६ साली आमिर व शाहरुख एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले होते. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या शाहरुखने तोशिबा कंपनीचा एक लॅपटॉप खरेदी केला. दरम्यान आमिरनेही एखादा लॅपटॉप खरेदी करावा असा आग्रह शाहरुखनं त्याला केला. परंतु तंत्रज्ञानाची काही खास आवड नसलेल्या आमिरने त्यास साफ नकार दिला. बराच काळ वाद विवाद केल्या केल्यानंतर शेवटी शाहरुखने जबरदस्तीने एक लॅपटॉप स्वत:च खरेदी केला व आमिरला भेट दिला.

लॅपटॉप नको नको म्हणणाऱ्या आमिरनं शाहरुखने भेट दिलेल्या या लॅपटॉपकडे ढुंकूनही पाहिले नाही. तब्बल पाच वर्षानंतर आमिरच्या सहाय्यकाची नजर या लॅपटॉपकडे गेली. तुम्ही तर वापरत नाही, मी हा घेऊ का असं विचारणाऱ्या सहाय्यकाला आमिरनं बिनधास्त घे असं सांगितलं. लॅपटॉप सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तब्बल पाच वर्ष धूळ खात पडलेला लॅपटॉप नादुरूस्त झाला होता व सुरू होऊ शकला नाही.

शाहरूखनं दिलेल्या या भेटीच्या आठवणी आमिरनं हसत हसत सांगितल्या आणि दोघांमध्ये ऑल इज वेल असल्याचाही एक संदेश जाता जाता दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 1:04 pm

Web Title: aamir khan funny incident with shah rukh khan when bought him a laptop
Next Stories
1 सलमान ठरला कॅमिओचा बादशहा; पाहुणा कलाकार असून गाजवले ‘हे’ १० चित्रपट
2 पडद्यावरील कथा सत्यात; अभिनंदनच्या वडिलांच्या आयुष्यातील नकोसा योगायोग
3 १२ वर्षांनी शाहरुख-अक्षय पडद्यावर एकत्र झळकणार?
Just Now!
X