मराठी चित्रपटाच्य इतिहासात अजरामर ठरलेला व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला आणि डॉ. श्रीराम लागू, संध्या, वत्सला देशमुख, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पिंजरा’ हा चित्रपट अभिनेता आमीर खान याला पाहायचा आहे. चिक्षत्रपटाच्या जुन्या प्रिंटवर तांत्रिक प्रक्रिया करुन हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.पुन्हा नव्याने सादर झालेला ‘पिंजरा’ हा चित्रपट पाहायची इच्छा त्याने ‘ट्विटर’वरुन व्यक्त केली आहे. महान दिग्दर्शकांचे चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळत नाहीत. असे चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद व समृद्ध करणारा अनुभव असतो, असे ‘ट्विट’ त्याने केले आहे.