News Flash

Video : ‘जबरा फॅन’! देव्हाऱ्यात फोटो ठेवून आमिरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

या चाहत्याने त्याच्या रिक्षावरही आमिरचे काही फोटो चिटकवले आहेत.

Video : ‘जबरा फॅन’! देव्हाऱ्यात फोटो ठेवून आमिरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
आमिर खान

मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आज त्याच्या ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘यादों की बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा अभिनेता आज प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. वर्षाकाठी केवळ एकच ब्लॉकबस्टर चित्रपट करणारा आमिर चित्रपटाच्या निवडीबाबत बराच चोखंदळ आहे. त्याच्या याच गुणशैलीमुळे त्याला मि. परफेक्शनिस्ट म्हणून संबोधलं जातं. आज आमिरचा वाढदिवस असल्यामुळे सर्व स्तरांमधून त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्याच्या एका चाहत्याने त्याला आगळीवेगळी शुभेच्छा दिली आहे.

सध्या पाहायला गेलं तर सोशल मीडियामध्ये आमिरवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. मात्र या साऱ्यामध्ये आमिरच्या एका जबरा फॅनची जोरदार चर्चा रंगली आहे. आमिरचा एक चाहता आमिरच्या प्रत्येक वाढदिवशी काही ना काही तरी वेगळी संकल्पना निवडत त्याला शुभेच्छा देत असतो. यावेळी देखील त्याने एक हटके संकल्पना निवडल्याचं पाहायला मिळालं. या चाहत्याने एका रिक्षामध्ये देव्हारा ठेवला होता. या देव्हाऱ्यामध्ये त्याने आमिरचा फोटो ठेऊन त्याला फुलांच्या माळा घातल्या होत्या. त्याच्यासाठी आमिर देवासमान आहे त्यामुळे त्याने अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चाहत्याने त्याच्या रिक्षावरही आमिरचे काही फोटो चिटकवले आहेत.

या चाहत्याप्रमाणेच अन्य काही चाहत्यांनीही त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने आमिरचे आतापर्यंत ठरलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची यादी शेअर केली आहे. त्यासोबतच कमाईचा आकडाही सांगितला आहे.

केवळ देशातच नाही तर परदेशातही आमिरचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे काही परदेशी चाहत्यांनी आमिराला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान,आमिरच्या वाढदिवस त्याचे चाहते एखाद्या मोठ्या सण-उत्सवाप्रमाणे साजरा करत आहेत. मात्र आमिरने दरवर्षीप्रमाणे त्याचा वाढदिवस मीडियासोबत सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळत आहे. आमिर दरवर्षी त्याचा वाढदिवस मीडिया, फोटोग्राफर यांच्यासोबत सेलिब्रेट करत असतो. यावेळी त्याच्यासोबत पत्नी किरण रावदेखील उपस्थित असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 4:17 pm

Web Title: aamir khan wishes his fans on his birthday
Next Stories
1 या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा आमिर आणणार रिमेक
2 ‘सावधान! पुढे गाव आहे’- एक गूढ आणि रहस्यपूर्ण कथा
3 ‘या’ कारणामुळे सनी लिओनीला आवडतो धोनी
Just Now!
X