अभिनेता आमिर खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाची विजयी घोडदौड सध्याही सुरुच आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन इतके दिवस उलटल्यानंतरही या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेले उत्साहाचे वातावरण तसूभरही कमी झालेले नाही. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली, कुस्तीपटू गीता-बबिता फोगट यांच्या कुस्तीपटू बनण्याच्या आजवरच्या प्रवासावर या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने नावाप्रमाणेच ‘दंगल’ करत ३८५ कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलग सहाव्या आठवड्यातही आमिरचा ‘दंगल’ हा चित्रपट इतर चित्रपटांना चांगलीच टक्कर देत आहे. काही दिवसांपूर्वीच कोइमोइ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ने भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर २३.४७ कोटी डॉलर कमविले होते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चित्रपटाने १९७.६७ कोटी कमविले होते. त्यामुळे, आमिरचा हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला असून, ‘पीके’ नंतर ‘दंगल’ने ७२१.१४ कोटींची बक्कळ कमाई केली होती. यापूर्वी, आमिरच्याच ‘पीके’ चित्रपटाने जगभरात ७९२ कोटी इतकी कमाई केली होती. दरम्यान दर दिवसागणिक दंगलच्या कमाईचे आकडे वाढतच असल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

कोइमोइ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘दंगल’ चित्रपटाने जगभरात ७४१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे याता आमिर खानचा हा चित्रपट त्याच्याच ‘पीके’ या चित्रपटाचा ७९२ कोटींचा आकडा ‘दंगल’ पार करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या वाट्याला येणाऱ्या या यशाविषयी बोलताना ‘प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून माझे मन अक्षरश: भरुन आले आहे’, असे आमिर म्हणाला.

भारतीय चित्रपटांना सध्या जागतिक स्तरावरही मिळणारी लोकप्रियता लक्षणीय आहे. आतापर्यंत ‘पीके’ (७९२ कोटी),
‘दंगल’ (७४१.८ कोटी), ‘बजरंगी भाईजान’ (६२६ कोटी), ‘सुलतान’ (५८९ कोटी) आणि ‘धूम’ (५५८ कोटी) अशी कमाई या चित्रपटांनी केली आहे.

कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले कथानक या चित्रपटाद्वारे साकारण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान, फतिमा सना शेख, सान्या मल्होत्रा या कलाकारांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

वाचा: ‘दंगल’नंतर आमिरला का हवाय एकांत?