निता अंबानीच्या शानदार बर्थडे पार्टीनंतर मुंबईत परतलेल्या आमिरने दिवाळीनिमित्त आपल्या घरी पार्टी दिली होती. त्याने वांद्रे येथील त्याच्या नव्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या घरी तो याच वर्षी राहायला आला आहे. त्याचे आणखी एक घर पाली हिल भागातही आहे.
आमिरच्या दिवाळी पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यात त्याच्यासोबत ‘पीके’ मध्ये काम करीत असलेल्या अनुष्का शर्मापासून ते सिद्धार्थ रॉय कपूर-विद्या बालन, अनिल कपूर, आशुतोष गोवारीकर त्याची पत्नी सुनीता, इमरान खान व त्याची पत्नी अवंतिकासह अनेक सेलेब्स पार्टीत पोहोचले होते. ‘धूम ३’ च्या प्रदर्शनाची वाट पाहणा-या आमिरच्या या पार्टीत सगळ्याचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होती ती त्याची मुलगी ईरा. ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. १६ वर्षीय ईराने मोरपिसी साडी नेसली होती आणि हातात बांगड्या घातल्या होत्या. छोट्या केस असल्यामुळे तिने अधिक मेकअप करताना साधेचे राहणे पसंत केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 5, 2013 3:22 am