बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान aamir khan याच्या २०१३ साली आलेल्या ‘धूम ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले होते. त्यानंतर या ‘दंगल’ अभिनेत्याने चित्रपटाच्या यशाच्या मोजमापाची नवी परिभाषा आणली. त्याच्या मते, जर तुम्हाला चित्रपटाचे यश जाणून घ्यायचे असेल तर आठवड्याच्या अखेरच्या दिवसांतील कमाईची संपूर्ण कमाईसोबत तुलना करावी. विकएण्डमध्ये ४० कोटी कमाविणाऱ्या ‘३ इडियट्स’ने २०२ कोटी रुपयांची कमाई केली होती. विकएण्डमधील कमाईला पाचने गुणल्यावर हा आकडा आला होता. जो नक्कीच चांगला आहे. याचाच अर्थ तो चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपटगृहाकडे वळले. तीन दिवसांत १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट जर एकूण कमाई २०० कोटी रुपये करत असेल तर तो चांगला चित्रपट नाही, असे आमिरचे म्हणणे आहे.

वाचा : …म्हणून मी मांसाहार सोडला – सनी लिओनी

आमिरच्या वक्तव्याचा विचार केल्यास एका वेबसाईटने केलेल्या पडताळणीनुसार, इरफान खान आणि सबा कमर यांचा ‘हिंदी मीडियम’ हा २०१७ मधील आतापर्यंतचा यशस्वी चित्रपट म्हणावा लागेल. ‘हिंदी मीडियम’ने Hindi Medium सुरुवातीच्या आठडव्यात १२.५६ कोटी रुपयांची कमाई केलेली तर ‘बाहुबली २ द कनक्लुजन’ने Baahubali 2 The Conclusion (हिंदी व्हर्जन) १२८ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यांची लाइफटाइम कमाई पाहिली तर ‘हिंदी मीडियम’ची ५८.६६ कोटी तर ‘बाहुबली २’ ची ५००.१३ कोटी रुपये इतकी आहे. सुरुवातीच्या आठवड्यातील कमाईनुसार रँकिग काढल्यास ‘हिंदी मीडियम’ पहिल्या स्थानावर असून ‘बाहुबली २’ दुसऱ्या स्थानावर आहे. खालील तक्त्यात तुम्ही ही रँकिग पाहू शकता. यामध्ये राणा डग्गुबतीचा ‘गाझी अटॅक’ तिसऱ्या तर वरुण धवन-आलिया भट्टचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चौथ्या स्थानावर आहे. अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ला पाचवे स्थान मिळाले आहे.

वाचा : रणबीरला फक्त ५००० रुपये देण्यासही शाहरुखचा नकार

या गुंतागुंतीच्या आकडेवारीत साहजिकच ‘बाहुबली २’ला ‘हिंदी मीडियम’ने मात दिलेली दिसते. असे असले तरी अखेर प्रत्येकजण संपूर्ण बॉक्स ऑफिस कमाईचाच विचार करतो. मात्र, या आकडेवारीनुसार रँकिंगमध्ये वर असणारा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये अधिक काळ चालतो असे म्हटले जातेय.