बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा एक शर्टलेस फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
आमिरचा व्हायरल झालेला हा फोटो अविनाश गोवारीकर या फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये आमिर एका सोफ्यावर बसला आहे आणि तो वळून कॅमेऱ्याकडे बघताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ‘आमिर खान सोबत पोस्ट फोटो शूट’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. आमिर या फोटोमध्ये हॅंडसम दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर आमिरच्या शर्टलेस फोटोची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नुकताच आमिरने ‘लाल सिंह चड्ढा’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर खान भूमिका साकारणार आहे. आता तो गुलशन कुमार यांच्या ‘मुगल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. जेव्हा या चित्रपटाची चर्चा सुरू होती तेव्हा अभिनेता अक्षय कुमार मुगल चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अक्षयच्या जागी आमिर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 6:53 pm