26 September 2020

News Flash

PHOTO: सुबोधने शेअर केला घाणेकरांच्या भूमिकासाठीच्या लूक टेस्टचा फोटो

पहिल्याच लूक टेस्टमध्ये सुबोध हुबेहूब काशिनाथ घाणेकरांप्रमाणे दिसून येत आहे.

सुबोध भावे, अभिनेता

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित ठरलेला ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासून सुरु असलेली चर्चा अद्यापही थांबलेली नाही. त्यातच आता अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटासाठी दिलेल्या पहिल्या लूक टेस्टचा फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या टीझरपासून संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाली. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा ‘एकदम कडक’ प्रतिसाद मिळत आहे. त्यात भर पडली आहे ती सुबोधने शेअर केलेल्या फोटोची. सुबोधने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो काशिनाथ घाणेकरांच्या रुपात दिसून येत आहे.

काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सुबोधने पुरेपूर प्रयत्न केला असून हुबेहूब त्यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी त्याने पहिली लूक टेस्ट दिली होती. या पहिल्या लूक टेस्टमध्येच तो काशिनाथ यांच्याप्रमाणे भासत असल्याचं दिसून येत आहे.

‘तुमचं भविष्य तुमच्या विचारात असतं आणि ते घडवायची ताकद तुमच्या मनगटात, ‘स्वतःवर विश्वास ठेव अन एक पाऊल पुढे टाक…’, असं कॅप्शन सुबोधने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. दरम्यान, काशिनाथ घाणेकर यांचा लूक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 10:15 am

Web Title: aani kashinath ghanekar first look test photo share by subodh bhave
Next Stories
1 Video : ‘राम जन्मभूमी’चा ट्रेलर प्रदर्शित, डिसेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘डेट विथ सई’; सईची पहिली मराठी वेब सीरिज
3 चित्तथरारक ‘होरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X