News Flash

शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सूनबाई’मध्ये नवे वळण

मालिकेतील शुभ्रा आता वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. सध्या मालिका एका रंजन वळणावर येऊन पोहोचली आहे.

‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे. ही मालिका आता उत्कंष्ठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत प्रेक्षकांनी अनुराग म्हणजेच अभिनेता चिन्मय उदगीरकरची एण्ट्री पाहिली. आधी या मालिकेत शुभ्राचे वेगळे रूप प्रेक्षकांनी पाहिली. आधी शुभ्रा थोडी बुजरी होती. सतत बबडूच्या काळजीत असलेली शुभ्रा ‘मी करते ते बरोबर की नाही’ हा भाव तिच्या मनात असायचा. बबडूची जबाबदारी असल्याने ती घरातच होती. पण शुभ्राचा आत्मविश्वास आता परत आला असून तिने डीबीके फूड्स जॉईन केलं आहे.

आणखी वाचा : ‘देवमाणूस’ मालिकेत अजून एक नवीन चेहरा

शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे. पण शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय. सोहमच्या घरी येऊन शुभ्राला घराच्या बाहेर घालवून त्या घरावर राज्य करण्याची स्वप्न सुझॅन पाहतेय. पण शुभ्रा देखील तिची खोड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सुझॅनला जर हे घर आपलंस करायचा असेल तर या घरातील सुनेची सर्व कामं देखील करावी लागतील असं म्हणून शुभ्रा तिला कामाला जुंपते आणि तिच्याकडून घरची सर्व कामं करून घेते. यासगळ्यानंतर आता सुझॅनची अक्कल ठिकाणावर येणार कि ती पुन्हा शुभ्राला त्रास देण्यासाठी काही नवीन प्लांनिंग करणार? शुभ्रा सुझॅन आणि सोहमला कसं वठणीवर आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:25 pm

Web Title: aasavari shubhra soham aagbai sunbai serial update avb 95
Next Stories
1 म्यानमारहून भारतात पायी चालत आल्या होत्या हेलन; ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता खुलासा
2 ‘कधी विचारही केला नव्हता…’, रस्त्यातच उतरलेल्या विमानाचा व्हिडीओ शेअर करत प्रीति म्हणाली
3 अथिया शेट्टी व केएल राहुल इंग्लंडमध्ये एकत्र? इन्स्टा पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा
Just Now!
X