05 March 2021

News Flash

आशिकी फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात दाखल

आशिकी चित्रपटाद्वारे केली होती अभिनयाची सुरूवात

१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी या सुपरहिट चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय सध्या आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. दरम्यान, त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आजतकनं पीटीआयच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार त्याला दोन दिवसांपूर्वीच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ५२ वर्षीय राहुल रॉयला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याचं म्हटलं जात आहे. मोठ्या कालावधीनंतर राहुल रॉय नव्या चित्रपटाद्वारे पुन्हा पदार्पण करणार होता. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy)

राहुल रॉयनं १९९० मध्ये आशिकी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्या चित्रपटानंतर राहुल रॉयला मोठी ओळखही मिळाली. त्यानंतर राहुलनं तब्बल ४७ चित्रपट साईन केले. परंतु हळूहळू राहुल रॉय लाईमलाईटपासून दूर होत गेला. त्यानंतर बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचंही विजेतेपद मिळवून तो पुन्हा चर्चेत आला होता. अनेक वर्षानंतर तो LAC- Live the Battle या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण कारगिलमध्ये सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 7:36 pm

Web Title: aashiqui move fame rahul roy suffers brain stroke during film shooting in kargil admtted in icu jud 87
Next Stories
1 सोनू सूदने दिला चाहत्याला मदतीचा हात; उचलला शस्त्रक्रियेचा खर्च
2 दीपिका- कतरिनाला पाहिल्यानंतर…; कियाराने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा
3 चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘नटसम्राट’
Just Now!
X