News Flash

अभिजीत बिचुकलेने घेतली जितेंद्र जोशीची फिरकी, पाहा व्हिडीओ

हा किस्सा एका शोमध्ये घडला आहे

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘दोन स्पेशल’ हा शो चर्चेत आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा अभिनेता जितेंद्र जोशीवर सोपावण्यात आली आहे. शोमध्ये येणारे कलाकार आणि जितेंद्रचा दिलखुलास अंदाज एकंदरीत प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतर असल्याचे पाहायला मिळते. या शोमध्ये जितेंद्र अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कलाकारांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान जितेंद्र कलाकारांच्या आयुष्यातील गुपितं देखील सर्वांसमोर आणतो.

नुकताच जितेंद्रच्या ‘दोन स्पेशल’ या शोमध्ये बिग बॉस मराठी पर्व २ च्या कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये अभिजीत बिचुकले, शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, सुरेखा पुणेकर आणि माधव देवचक्के हे कलाकार सहभागी होती. दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अभिजीत बिचुकलेने. शो जितेंद्र आणि बिचुकलेमध्ये मजामस्ती सुरु होती. दरम्यान जितेंद्रने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत बिचुकलेने त्याची फिरकी घेतली असल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच बिचुकलेने दिलेली उत्तरे ऐकून तुम्हालाही हसू येईल.

आणखी वाचा : शिवच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, वीणासमोरच केला खुलासा

‘साताऱ्यापासून अनेक शहरांमध्ये दर गणेश उत्सवात तुम्हाला बोलावले जाते’ असा प्रश्न जितेंद्र बिचुकलेला विचारतो. त्यावर बिचकले ‘माझे पाच मराठी आणि एक हिंदी चित्रपट येणार आहे. त्यांनी फक्त मला चित्रपटासाठी किती मानधन घेणार इतकेच विचारले आहे. पण मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आता थोडे दिवस थांबा’ असे उत्तर दिले आहे. बिचुकलेंची प्रसिद्धी ऐकून जितेंद्र चकित होतो. त्यानंतर जितेंद्रने दिलेल्या उत्तराने सर्वत्र हास्याची लाट पसरली आहे. ‘मी तर २१ वर्षे फक्त सूत्रसंचालनच करत बसलो’ असे जितेंद्र म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 5:27 pm

Web Title: abhijeet bichukle make a fun of jitendra joshi avb 95
Next Stories
1 १५ वर्षानंतर ‘चित्रहार’ची होस्ट सध्या काय करते?
2 …म्हणून मी तिच्या प्रेमात आहे
3 लकी अभिनेत्रीचं नाव आयुषमाननं केलं जाहीर
Just Now!
X