काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता तिवारी चर्चेत होती. या चर्चा तिने पती अभिनव कोहली विरोधात पोलिसात तक्रार केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. नुकताच अभिनवने श्वेताचा कोस्टार फहमानसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण श्वेताचा व्हिडीओ शेअर करताच त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. तसेच अभिनवने श्वेता विषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

अभिनवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फहमान आणि श्वेता मस्ती करताना दिसत आहेत. तसेच दोघांनीही चेहऱ्याला मास्क लावले आहे. फहमान व्हिडीओमध्ये मास्कच्या मागे कोणती व्यक्ती आहे हे ओळखण्यास सांगते.

अभिनवने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर श्वेता आणि फहमानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या संदर्भात त्याने टेलिचक्करला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने व्हिडीओ शेअर करण्याबाबत वक्तव्य केले. ‘मला सध्या तरी त्यांच्या विषयी फारशी माहिती नाही. पण आता गोष्टी क्लीअर करण्यासाठी अशा आणखी पोस्ट समोर येतील. श्वेता आणि फहमानच्या व्हिडीओबद्दल बोलायचे झाले तर ते दोघे अचानक भेटले नव्हते. दोघेही माझ्या घराखाली ठरवून भेटले होते’ असे अभिनवने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Fahwaan Khan @shweta.tiwari

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024) on

आणखी वाचा : माझे दुसरे लग्न म्हणजे ‘विष प्रयोग’

काही दिवसांपूर्वी श्वेताला एका मुलाखतीमध्ये अभिनव विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने, ‘लोकं मला प्रश्न विचारतात दुसरं लग्न देखील कसं चुकीचं असू शकतं? मी त्या लोकांना विचारु इच्छिते की का चुकीचे असू शकत नाही? कमीत कमी माझ्याकडे त्या गोष्टींना सामोरे जाण्याची हिम्मत आहे. मी माझ्या गोष्टी सर्वांसमोर बिनधास्तपणे मांडते. आज मी जे काही करत आहे ते माझ्या कुटुंबीयांच्या आणि मुलांच्या चांगल्यासाठीच’ असे म्हटले होते.

पाहा : मालिकेच्या एका भागासाठी इतके मानधन घेतात ‘या’ अभिनेत्री

‘असे किती विवाहित लोकं आहेत ज्यांचे लग्नानंतरही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहेत. मला असं वाटतं मी त्यांच्या पेक्षा खूप चांगली आहे. माझ्यामध्ये इतकी हिम्मत आहे की मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही हे सांगू शकते’ असे श्वेता पुढे म्हणाली.