News Flash

अभिनय बेर्डे-मयुरेश पेम देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना

अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांचा धमाकेदार परफॉर्मन्स.

अभिनय बेर्डे, मयुरेश पेम

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमा हा विषय दोन दिग्गजांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि द्व्यर्थी विनोदाचा सम्राट दादा कोंडके यांनी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि एक काळ गाजवला. या दोन महान विनोदवीरांना मानवंदना देण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० मध्ये अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम सज्ज झाले आहेत.

यावर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरूप थोडं वेगळं आहे. यावर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात नॉमिनीज आणि पाहुणे हे व्हर्च्युअली एकमेकांशी जोडले गेले होते. या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. या खास परफॉर्मन्ससाठी मयुरेश पेमने दादा कोंडके यांची वेशभूषा केली होती तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय बेर्डे याने लक्ष्याची वेशभूषा केली. या दोघांनी मिळून त्यांच्या सदाबहार गाण्यांवर ताल धरला. प्रेक्षक देखील त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आणखी वाचा : जेव्हा भूमी पेडणेकरला फिल्म स्कूलमधून काढलं; फेडावं लागलं १३ लाख रुपयांचं कर्ज

त्यांच्या या परफॉर्मन्सबद्दल बोलताना अभिनय म्हणाला, “बाबांचा वाढदिवस नुकताच होऊन गेला आणि त्यांना मानवंदना देण्याची संधी मला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सने दिली याचा मला आनंद आहे. त्यांची सगळीच गाणी ही खूप लोकप्रिय आहेत, त्यातील काही निवडक गाण्यांवर आपल्या स्टाईल परफॉर्म करताना मला खूपच मजा आली.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:26 am

Web Title: abhinay berde and mayuresh pem to give tribute to laxmikant berde and dada kondke ssv 92
Next Stories
1 रामायणातील ‘सीता’ साकारतेय अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका; पाहा ट्रेलर
2 जेव्हा भूमी पेडणेकरला फिल्म स्कूलमधून काढलं; फेडावं लागलं १३ लाख रुपयांचं कर्ज
3 ‘मिर्झापूर २’ विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या महिला खासदाराला पंकज त्रिपाठींचं उत्तर, म्हणाले..
Just Now!
X