18 February 2020

News Flash

अभिनय बेर्डेच्या फेक फेसबुक अकाऊंटवरून मुलीकडे बोल्ड फोटोची मागणी

प्रिया बेर्डे करणार तक्रार दाखल..

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट काढून एका मुलीची फसवणूक करण्यात आली आहे. ‘एका चित्रपटासाठी तुझा बोल्ड फोटो पाठवून दे’, असा मेसेज करत संबंधित तरुणीला फसवण्यात आले आहे. याबद्दलची माहिती देत प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. फेक फेसबुक अकाऊंटविरोधात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

अभिनयच्या फेक अकाऊंटचा स्क्रीनशॉट प्रिया यांनी शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिले, “सावधान.. हा प्रोफाइल अभिनयचा नाही, या प्रोफाइल वरून एका मुलीला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि सांगितलं की नागराज मंजुळे बरोबर एक फिल्म करतोय आणि त्यात बोल्ड सीन आहेत आणि तुझा एक बोल्ड फोटो पाठवून दे तर त्या मुलीने आम्हाला कॉन्टॅक्ट करून वरील माहिती दिली. तेव्हा प्लीज कुणीही याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, आम्ही अॅक्शन घेत आहोत.. या आधीही मी याबाबत पोस्ट टाकली होती हे ही नमूद करतेय.”

अभिनयच्या संबंधित फेक अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. याविरोधात प्रिया बेर्डे तक्रार करणार असल्याचंही कळतंय.

First Published on January 17, 2020 2:37 pm

Web Title: abhinay berde fake fb account asked a girl bold photo priya berde to take action ssv 92
Next Stories
1 #MeToo : पुराव्याअभावी अनु मलिकवरील लैंगिक गैरवर्तणुकीचा खटला बंद
2 चाहतीच्या त्रासामुळे वैतागला मराठमोळा अभिनेता; फेसबुक लाइव्हद्वारे मांडली व्यथा
3 लग्नाआधीच आई होण्यावर कल्किच्या कुटुंबीयांची अशी होती प्रतिक्रिया
Just Now!
X