27 September 2020

News Flash

‘९ पैकी ८ चित्रपटात ऐश्वर्याला माझ्यापेक्षा जास्त मानधन’

आठ वर्षांनंतर दोघंही 'गुलाबजामुन' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघंही लवकरच एका चित्रपटातून बऱ्याच वर्षांनंतर एकत्र  काम करणार आहे. आठ वर्षांनंतर दोघंही एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या  चित्रीकरणाला सुरूवातही झाली आहे. यानिमित्तानं अभिनेषकनं नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानधनातील तफावतीविषयी अभिषेकनं आपलं मत मांडलं आहे.

महिला अभिनेत्रींना अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन मिळतं यावरून अनेकदा वाद होतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. मी आणि ऐश्वर्यानं ९ चित्रपटात काम केलं. त्यापैकी आठ चित्रपटात माझ्यापेक्षाही अधिक मानधन हे ऐश्वर्याला मिळालं होतं. ‘पिकू’मध्ये सर्वाधिक मानधन मिळालेली व्यक्ती दीपिका पादुकोन होती, या इण्डस्ट्रीत कलाकार किती यशस्वी आहे यावरुन त्याचं मानधन ठरतं. जर नवोदीत कलाकार शाहरुखइतकंच मानधन मागत असेल तर त्याला ते कसं मिळणार? असा सवालही अभिषेकनं विचारला आहे.

मानधनातील तफावत या मुद्द्यावर पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन त्यानं दिला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग बसुच्या ‘गुलाबजामुन’  चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 1:25 pm

Web Title: abhishek bachchan on pay parity aishwarya was paid more than me
Next Stories
1 तिच्या खांद्यावर दीप-वीरच्या लग्नाची जबाबदारी
2 ‘बाजीगर’ने शाहरुखच्या करिअरची बाजू पलटली
3 Video : ‘कुणी येणार गं’; स्वप्नील- मुक्ताच्या घरी नवा पाहुणा
Just Now!
X