News Flash

हर्ष गोयंकांनी केले जगातील सुंदर महिलांशी संबंधित ट्विट, अभिषेक बच्चनने दिले उत्तर

त्या दोघांमधील संवाद हा सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आजकाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. तसेच चाहत्यांना उत्तर देताना देखील दिसतो. नुकताच अभिषेकने सुंदर महिलांविषयी उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलेल्या ट्विटला देखील उत्तर दिले आहे.

हर्ष गोयंका यांनी ट्विटमध्ये ‘स्मार्ट पुरुष जगातील सर्वात सुंदर महिलांवर प्रेम करत नाहीत. ते अशा महिलांवर प्रेम करतात ज्या त्यांचे जग सुंदर बनवातात’ असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये हॅशटॅग देखील वापरला आहे. त्यांच्या या ट्विटरवर अभिनेता अभिषेक बच्चनने उत्तर दिले आहे.

अभिषके यावर उत्तर देत ‘अच्छा’ असे म्हटले असून दोन इमोजी वापले आहेत. त्यामध्ये एक हसतानाचा आणि एक हात वर केल्याचा इमोजी वापरला आहे. त्यानंतर हर्ष गोयंका यांनी पुन्हा अभिषेकला उत्तर दिले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये ‘तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हर्ष आणि अभिषेकमध्ये झालेल्या संवादाची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सुंदर महिलांपैकी एक आहे. २० एप्रिल २००७ मध्ये अभिषेक बच्चनने ऐश्वर्याशी लग्न केले. वैवाहिक जीवनानंतर काही काळ ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर राहिली होती. पण तिने पुन्हा एकदा बी टाऊनमध्ये पदार्पण करत चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांचेच लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 6:09 pm

Web Title: abhishek bachchan reply to harsh goenka tweet which is related to world most beautiful women avb 95
Next Stories
1 “कुणीही तुम्हाला जबरदस्तीनं ड्रग्ज देऊ शकत नाही; याचं मुंबईशी काही घेणंदेणं नाही”
2 अनुराग कश्यपला अटक करा, कंगनाची मागणी
3 ‘गिन्नी वेड्स सनी’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित
Just Now!
X