01 December 2020

News Flash

जर अभिषेक “बच्चन” नसता…, अभिषेकने केले ट्रोलरलाच ट्रोल

अभिषेकने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा आहे..

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो अनेकदा पोस्ट करत चाहत्यांशी गप्पा देखील मारताना दिसतो. बऱ्याचवेळा त्याला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण अभिषेकही शांत बसत नाही. या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतो. नुकताच एका यूजरने सोशल मीडियावर अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण अभिषेकने दिलेल्या उत्तराने तो यूजर स्वत:च ट्रोल झाला आहे.

सोशल मीडियावर एका यूजरने एएनआयचा एका फोटो शेअर केला होता. हा फोटो एका शेतकऱ्याचा असल्याचे म्हटले जाते. फोटोमधील व्यक्ती ही अभिषेक बच्चन सारखी दिसत असल्याचे त्या यूजरने म्हटले आहे. ‘जर अभिषेक “बच्चन” नसता तर’ या आशयाचे ट्विट करत अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

अभिषेकने या यूजरला उत्तर दिले आहे. त्याने ‘हाहाहा खूप मजेशीर आहे. पण तरी पण मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो’ या आशयाचे उत्तर अभिषेकने दिले असून त्या यूजरलाच ट्रोल केले आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:16 pm

Web Title: abhishek bachchan reply when a troll shares pic of farmer avb 95
Next Stories
1 मोनालिसाचा ‘करंट’ देणारा अंदाज पाहिलात का?
2 “तेजस्वी यादवच जिंकणार”; महाआघाडीच्या विजयासाठी फराह खानची प्रार्थना
3 ‘अमेरिकेतील सत्ता गेली अन् आता बिहारची बारी’; प्रकाश राज यांचा उपरोधिक टोला
Just Now!
X