News Flash

अभिनेत्यानं उडवली अभिषेक बच्चनची खिल्ली; म्हणून त्याला चित्रपटात काम मिळत नाही…

या फोटोवरुन त्याने अभिषेकची खिल्ली उडवली आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याला शुभेच्छा देण्यासाठी रितेश देशमुखनं त्याच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. या फोटोवरुन केआरकेने अभिषेकची खिल्ली उडवली आहे.

स्वयंघोषित चित्रपट समिक्षण आणि अभिनेता कमाल खान (KRK) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सोशल मीडियाव्दारे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतो. यावेळी त्याने बर्थडे बॉय अभिषेक बच्चनवर निशाणा साधला आहे.

रितेशनं शेअर केलेल्या फोटोवर केआरके म्हणाला, “मला आठवतयं त्यावेळी एका पत्रकाराने अभिषेकला चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारण्याबाबत प्रश्न विचारला होता. आणि त्यावेळी खाली बसलेले सर्व जण त्याची खिल्ली उडवत होते. खरं तर त्याला म्हणूनच हाऊसपुल ४ मध्ये देखील काम मिळाले नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खाननं अभिषेकची खिल्ली उडवली.

यापूर्वी त्याने सुशांत सिंह राजपूतची देखील अशाच प्रकारे खिल्ली उडवली होती. “त्याला काम मिळत नसल्यामुळे तो भूमिगत झाला आहे” असे केआरकेने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 6:38 pm

Web Title: abhishek bachchan riteish deshmukh krk mppg 94
Next Stories
1 “आर्ची आली आर्ची”…गावकऱ्यांना मिळाली खबर अन्…
2 गणेश आचार्य यांच्यावर आणखी एका डान्सरने केला लैंगिक शोषणाचा आरोप
3 आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर पहिल्यांदाच दिशा पटानी म्हणाली..
Just Now!
X