News Flash

म्हणून चित्रपटात अभिषेक बच्चन इंटिमेट सीन देत नाही

एका मुलाखतीमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

अभिषेक बच्चन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. त्याची ‘ब्रीथ : इंटू द शॅडो’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिज संदर्भात अभिषेकने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बोल्ड सीन न देण्याबाबत व्यक्त केले आहे.

नुकताच अभिषेकने राजीव मसंद यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने इंटिमेट सीन न देण्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘काही चित्रपट आणि त्यातील सीन्स आता मला करायची इच्छा नाही. तसेच मी असे काही करणार नाही जे पाहून माझी मुलगी आराध्याला चांगले वाटणार नाही आणि ती मला प्रश्न विचारेल इथे नेमकं काय सुरु आहे’ असे अभिषेक म्हणाला.

 

View this post on Instagram

 

Look at the stars Look how they shine for you And everything you do Yeah they were all yellow- Coldplay. #fatherdaughter

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

‘मी निर्मात्यांना प्रोजेक्ट साईन करण्यापूर्वी नेहमी सांगतो की जर इंटिमेट सीन्स असतील तर ते करण्यासाठी मी तयार नाही. तुमच्याकडे इतरही पर्याय आहेत’ असे अभिषेक पुढे म्हणाला. त्यानंतर अभिषेकने इंटिमेट सीन करण्यास नकार दिल्यामुळे अनेक चित्रपट हातातून गेल्याचेही सांगितले आहे. पण अभिषेक आजही त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्याने सांगितले आहे.

‘मला माझ्या निर्णयामुळे पश्चाताप होत नाही. मी वेगळ्या बाजूने विचार करत आहे आणि दिग्दर्शक- निर्माते एका वेगळ्या बाजूने विचार करतात. त्यांना त्यावर विचार करायचा नसेल तर मी त्यांच्या निर्णयाचा नेहमी आदर करतो’ असे अभिषेक पुढे म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 9:55 am

Web Title: abhishek bachchan shares about self imposed no intimate scene policy avb 95
Next Stories
1 सलमानने सुष्मिताच्या वेब सीरिजवर केले ट्विट, सोशल मीडियावर झाला ट्रोल
2 ‘रसिकप्रेम हाच पुरस्कार’
3 नाटक..? आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर?
Just Now!
X