News Flash

अभिषेक बच्चनने रुग्णालयातून पोस्ट केला ‘हा’ फोटो

अभिषेक व बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिषेक बच्चन

अभिनेता अभिषेक बच्चनने नानावटी रुग्णालयातून एक फोटो पोस्ट केला आहे. अभिषेक व बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही करोनाची लागण झाल्याने ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिषेकने रुग्णालयातून काढलेला हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने काहीच कॅप्शन दिलं नसून नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटल हे फोटोच्या ‘location’ मध्ये दिसत आहे. ढगाळ वातावरणाचा हा फोटो अभिषेकने पोस्ट केला आहे.

अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना नुकतंच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या दोघींवरसुद्धा नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर जया बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. बिग बी रुग्णालयात असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. फोटो, पोस्ट, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात.

आणखी वाचा : अभिज्ञा भावे पुन्हा प्रेमात; ‘त्या’ खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो

११ जुलै रोजी बिग बी व अभिषेक बच्चन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आधी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर त्यांनासुद्धा नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं. या दोघींना करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र बिग बी व अभिषेक अजूनही रुग्णालयात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:37 pm

Web Title: abhishek bachchan shares picture from nanavati hospital as he undergoes covid 19 treatment ssv 92
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना करणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचे भन्नाट उत्तर
2 डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बिग बींची खास पोस्ट; म्हणाले…
3 अभिज्ञा भावे पुन्हा प्रेमात; ‘त्या’ खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो
Just Now!
X