20 January 2021

News Flash

मामा-भाच्याचा वादात कश्मीराची उडी? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

जाणून घ्या काय आहे तिची पोस्ट..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्या मधील वाद हा सतत चर्चेत असतो. वारंवार कृष्णाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर गोविंदाने वक्तव्य केले होते. आता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टद्वारे तिने गोविंदाला अप्रत्यक्ष टोला लगावला असल्याचे म्हटले जात आहे.

कश्मीराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मुलासाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘आई असल्यामुळे जेव्हा तुला एखाद्या अडचणीमध्ये मी पाहते तेव्हा मला दु:ख होते. मी अशा प्रत्येक गोष्टी आणि व्यक्तींना तुझ्यापासून दूर ठेवेन जे तुला दु:ख देतील. पर्सनल अजेंडासाठी तुझा वापर कोणालाही करु देणार नाही हे मी तुला आई म्हणून वचन देते’ या आशयाचे कॅप्शन कश्मीराने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कश्मीराने या पोस्टमध्ये तिचा मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णाने त्याचा मुलगा आजारी असल्याचे म्हटले होते. तो आजारी असताना देखील गोविंदा त्याला पाहायला आला नसल्याचे कृष्णाने म्हटले होते. त्यावर गोविंदाने देखील स्पष्टीकरण दिले होते. ‘मी कृष्णाच्या मुलाला पाहण्यासाठी गेलो होतो. पण कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीराने त्याला भेटू दिले नाही. तेथील डॉक्टर आणि नर्सने सांगितले की माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भेटण्याची परवानगी नाही. त्यानंतर मी घरी परतलो’ असे गोविंदा म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 7:11 pm

Web Title: abhishek wife kashmera shah pens a cryptic note about protecting family avb 95
Next Stories
1 नव्या मालिकेसाठी सज्ज झालाय सिद्धार्थ चांदेकर
2 बिग बॉसच्या घरात राहुलने केलं प्रेयसीला प्रपोज, दिशा परमार म्हणाली…
3 उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर शेअर केला मोबाईल नंबर, पण…
Just Now!
X