15 December 2018

News Flash

PHOTO : तिच्यासाठी एकत्र आले विव- नीना

ती फॅशन जगतात बरीच लोकप्रिय आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी चर्चेत होत्या. वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतचे नीना यांचे नाते पाहता त्याविषयीच्याच चर्चा रंगल्या होत्या. विवियन, नीना गुप्ता आणि त्यांनी मुलगी मसाबा असं हे सेलिब्रिटी कुटुंब सध्या प्रकाशझोतात आलं आहे. नीना आणि मसाबा या दोघीसुद्धा रिचर्ड्स यांच्यासोबत राहात नाहीत. पण, तरीही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मसाबाने सर्व कामं दूर लोटत आईच्या साथीने थेट दुबई गाठलं.

कामाचा प्रचंड ताण असतानाही आयुष्यात काही गोष्टींचं महत्त्वं जाणत तिने आपल्या वडिलांना हे सरप्राईज दिलं. सोशल मीडियावरही तिने या फॅमिली रियुनियनचा फोटो पोस्ट केला. या फोटोसोबतच तिने साजेसं कॅप्शनही दिलं. ‘आयुष्य किती लहान असतं. त्यामुळेच मी माझी सर्व कामं दूर सारुन बाबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरप्राईज देण्यासाठी निघून आले. या निमित्ताने आम्ही सर्वजण भेटलोसुद्धा’, असं कॅप्शन लिहित तिने हा फोटो पोस्ट केला.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने ८० च्या दशकापासूनच अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांनीही लग्न केलं नाही. पण, तरीही मसाबासाठी त्यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावण्याला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. मसाबा गुप्ता सध्याच्या घडीला फॅशन जगतात बरीच लोकप्रिय असून, ‘हाऊस ऑफ मसाबा’ या नावाने ती स्वत:चा फॅशन ब्रँड चालवते.

First Published on March 8, 2018 6:43 pm

Web Title: ace fashion designer masaba gupta has a family reunion with dad vivian richards and mom neena gupta see her post