27 November 2020

News Flash

हिना खानला करायचं होतं ‘या’ क्षेत्रात करिअर; पण…

...तर आज हिना खान अभिनेत्री नसती

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान. कमी कलावधीत हिनाने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं असून आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला अन्य दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचं होतं. तसंच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’साठी अचानक तिची निवड करण्यात आली असं तिने सांगितलं.

हिना खानला अभिनेत्रीऐवजी हवाईसुंदरी म्हणजेच एअर होस्टेस व्हायचं होतं. लहानपणापासून तिने हे स्वप्न पाहिलं होतं. मात्र ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेच्या माध्यमातून अचानक तिचं कलाविश्वात पदार्पण झालं आणि हेच क्षेत्र पुढे तिचं करिअर झालं.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. या ऑडिशनसाठी हिनाचे काही मित्र-मैत्रिणी जाणार होते. त्यामुळे त्यांना सोबत म्हणून हिनादेखील सहज ऑडिशनच्या ठिकाणी गेली होती. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी मालिकेच्या दिग्दर्शकांनी हिनाला फोन करु तुझी अक्षरा या मुख्य भूमिकेसाठी निवड झाली आहे, असं सांगितलं.

हिनाला अभिनेत्री कधीच व्हायचं नव्हतं. तिला एअर होस्टेस व्हायचं होतं म्हणून तिने एका कॉर्ससाठी प्रवेशदेखील घेतला होता. मात्र, त्याच दरम्यान ती आजारी पडली आणि तिला कोर्स पूर्ण करता आला नाही. विशेष म्हणजे कलाविश्वात उच्च शिक्षण घेणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून हिनाकडे पाहिलं जातं. हिनाने एमबीए केलं आहे.

दरम्यान, हिना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा ती तिची मतं परखडपणे मांडत असते. अलिकडेच ती कलाविश्वातील घराणेशाही, स्टार किड यांच्याविषयी वक्तव्य करुन चर्चेत आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:08 pm

Web Title: acting hina khan wanted to be an air hostess ssj 93
Next Stories
1 “घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी देव जबाबदार नाही”; शत्रूघ्न सिन्हा यांचा केंद्राला टोला
2 या दिवशी प्रदर्शित होणार अक्षयचा ‘Into The Wild’मधील एपिसोड
3 Video : ‘अजुनी’मधून उलगडणार परग्रहवासीयाची प्रेमकथा
Just Now!
X