News Flash

सात तासांच्या चौकशीनंतर अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयाबाहेर

यापूर्वी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची एनसीबीकडून सुमारे सहा तास चौकशी झाली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तापास सुरु असताना ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) तापस सुरु केला होता. त्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली. एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात धाड टाकली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्यानंतर अर्जुन रामपालला आज चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. जवळपास सात तास अर्जुनची चौकशी झाली आहे.

बुधवारी अर्जुनची गर्लफ्रेंड, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सची एनसीबीकडून सुमारे सहा तास चौकशी झाली. त्यानंतर आज गुरुवारी अर्जुनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. एनसीबीने जवळपास सात तास अर्जुनची चौकशी केली आहे.

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला लोणावळा येथून ताब्यात घेतले. ड्रग्जप्रकरणी त्याचे नाव समोर आल्याने अ‍अँगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 7:09 pm

Web Title: actor arjun rampal leave narcotics control bureau ncb office avb 95
Next Stories
1 ‘सदोष टेस्ट किटमुळे करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती’- चिरंजिवींचा खुलासा
2 ‘जब तक है जान…’, रहमान यांनी सांगितल्या आठवण
3 ‘मलाही २१ वर्षांची मुलगी आहे त्यामुळे…’, विनयभंगाच्या आरोपांवर विजय राजचे वक्तव्य
Just Now!
X