प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. गुरुवार (१० डिसेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा होणार नाही असं म्हटलं आहे.

“देऊळ बंद, मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव . संगीतकार नरेंन्द्र भिडे .. माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला… ऊन ऊन वठातून, आभाळा आभाळा, अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही… तीन वर्षांपूर्वी त्यांना ज्या दिवशी चाल सुचली तो दिवस…,” असं म्हणत प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आरारारा खतरनाक या गाण्याची चाल तयार करतानाचाही एक व्हिडीओ तरडे यांनी यासोबत शेअर केला आहे.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
decision to join bjp after discussion with jayant patil says eknath khadse
जयंत पाटील यांच्या अनुकूलतेनंतरच भाजप प्रवेशाचा निर्णय! एकनाथ खडसे यांचा दावा
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा

सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

नरेंद्र भिडे यांचे गाजलेले चित्रपट –

‘सरसेनापती हंबीरराव’ (आगामी), ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुरे’, ‘पाऊलवाट’, ‘अनुमती’ , ‘दिल ए नादान’ (बायोस्कोप), ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘शासन सिंहासन’, ‘चौदहवी का चाँद’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘आघात’, ‘शेवरी’, ‘रमा माधव’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, ‘मालक’, ‘मसाला’, ‘समुद्र’, ‘चाँद फिर निकला’ (हिंदी) याशिवाय ‘श्वास’, ‘सरीवर सरी’, ‘माती माय’ सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत.

नाटके –

‘कोण म्हणत टक्का दिला?’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘चिरंजीव आईस’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘जोडी तुझी माझी’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘गोडी गुलाबी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘लव्ह बर्डस’ , ‘व्हाईट लिली अँड नाईट रायडर’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’, ‘छापा काटा’, ‘आषाढातील एक दिवस’, ‘संगीत गर्वनिर्वाण’,

मालिका –

‘अवंतिका’, ‘ऊन पाऊस’, ‘साळसुद’, ‘घरकुल’, ‘मानो या ना मानो’, ‘पळसाला पाने पाच’, ‘भूमिका’, ‘पेशवाई’, ‘नूपुर’, ‘अबोली’, ‘श्रावण सरी’, ‘सुर – ताल’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘फुकट घेतला शाम’, ‘अमर प्रेम’.

नरेंद्र भिडेंना मिळालेले पुरस्कार

झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.