28 February 2021

News Flash

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन

स्तनाच्या कर्करोगामुळे अभिनेत्री किली प्रेस्टन यांचं निधन

हॉलिवूड अभिनेत्री किली प्रेस्टन यांचं निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या स्तनाच्या कर्करोगामुळे त्रस्त होत्या. १२ जुलै रोजी रविवारी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. किली प्रेस्टन यांचे पती अभिनेता जॉन ट्रावोल्टा यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची बातमी दिली.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

“माझी सुंदर पत्नी किली हिचं निधन झालं आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती स्तनाच्या कर्करोगामुळे त्रस्त होती. डॉक्टर्स तिच्यावर खूप चांगल्या प्रकारे उपचार करत होते. परंतु सांगताना मला प्रचंड दु:ख होतंय की डॉक्टर्स तिला वाचवू शकले नाहीत. उपचारादरम्यान तिचं निधन झालं. किली तू कायम माझ्या हृदयात राहशील. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाची पोस्ट करुन जॉन ट्रावोल्टा यांनी आपल्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अवश्य पाहा – ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन

 

View this post on Instagram

 

It is with a very heavy heart that I inform you that my beautiful wife Kelly has lost her two-year battle with breast cancer. She fought a courageous fight with the love and support of so many.  My family and I will forever be grateful to her doctors and nurses at MD Anderson Cancer Center, all the medical centers that have helped, as well as her many friends and loved ones who have been by her side. Kelly’s love and life will always be remembered. I will be taking some time to be there for my children who have lost their mother, so forgive me in advance if you don’t hear from us for a while.  But please know that I will feel your outpouring of love in the weeks and months ahead as we heal. All my love, JT

A post shared by John Travolta (@johntravolta) on

किली प्रेस्टन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. १९८० साली ‘हवाई फाईव्ह ओ’ या मालिकेतून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘लोन स्टार’, ‘ब्लू थंडर’, ‘द अमेरिकन क्लॉक’, ‘द परफेक्ट ब्राईड’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. ‘टेन टू मिडनाईट’ या हॉरर चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ‘मिसचिफ’, ‘ट्विंन्स’ आणि ‘लव्ह इज गन’ या चित्रपटांनी किली यांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:21 pm

Web Title: actor kelly preston passes away at aged 57 mppg 94
Next Stories
1 “यांना खरंच नेता म्हणायचं का?”; दिग्दर्शकाने साधला राजस्थानमधील घडामोडींवर निशाणा
2 करण जोहरने ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियावर बनवले नवे प्रायव्हेट अकाऊंट?
3 …म्हणून फोटोग्राफर्सवर संतापला अक्षय कुमार; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X