27 November 2020

News Flash

क्वारंटाइनचे नियम मोडण्याचा आरोप करणाऱ्यांना अभिनेत्याने दिले उत्तर, म्हणाला…

त्याने ट्विट करत युजरला सुनावले आहे.

टीव्ही क्वीन एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये अनुराग बासुची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आला होता. पार्थने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. आता त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तो सध्या कुटुंबीयांसोबत पुण्यात राहत आहे. दरम्यान एका यूजरने पार्थ क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे ट्विट केले आहे. त्या यूजरला रिप्लाय देत पार्थने चांगलेच सुनावले आहे.

एका यूजरने ट्विटरवर ‘टीव्ही अभिनेता पार्थ समथान बीएमसीच्या क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन करत आहे. बीएमसीने त्याचे घर सील केले होते. पण आता तो घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तो सार्वजनिक सोयीसुविधांचा वापर करत आहे. त्याच्या घरात काम करणारी व्यक्ती अजूनही करोना पॉझिटीव्ह आहे. बीएमसीने यावर लवकरात कारवाई करावी’ असे म्हटले आहे.

या यूजरच्या ट्विटवर पार्थने उत्तर दिले आहे. ‘माझी करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. मी १७ दिवस होम क्वारंटाइन होतो. खरतर १४ दिवसच होम क्वारंटाइन करतात. आणि हा काल रात्री मला पॅनिक अटॅक आला होता. तुम्ही मला डॉक्टरांकडे घेऊन जाता का? सध्या मी माझ्या कुटुंबीयांसोबत पुण्यात वेळ घालवत आहे’ असे म्हणत त्याने चांगलेच सुनावले आहे.

पार्थने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करत करोना झाल्याचे सांगितले होते. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्या’ असे त्याने म्हटले होते. आता पार्थने करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 1:24 pm

Web Title: actor parth samthaan has responded to allegations that he flouted quarantine rules avb 95
Next Stories
1 रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिताने केली ‘ही’ पोस्ट
2 ‘सज्जनसिंग’च्या मदतीसाठी सोनू सूद, मनोज बाजपेयी सरसावले पुढे
3 “सुशांतला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो”; महेश भट्ट यांचा पोलीस चौकशीत दावा
Just Now!
X