गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाऊंट हॅकिंगचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. यात अनेक सेलिब्रिटी सायबर फसवणुकीचे शिकार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमिषा पटेलचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुखला हा अनुभव आला आहे. मात्र, सुदैवाने वेळीच सतर्कता बाळगल्यामुळे त्याचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापासून वाचलं आहे. याविषयीचा एक व्हिडीओ आणि पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रितेशने ट्विट करत या हॅकिंगविषयी माहिती दिली आहे. सोबतच त्याने काही स्क्रिनशॉट आणि महाराष्ट्र सायबर सेल विभागाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मलादेखील अशा प्रकारचा मेसेज आणि लिंक आली होती. पण सुदैवाने मी त्या लिंकवर क्लिक केलं नाही”, असं कॅप्शन रितेशने या पोस्टला दिलं आहे.


दरम्यान, आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सायबर क्राइमला बळी पडले आहेत. यात अनेकांचे इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर असे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचं पाहायला मिळालं. यात आशा भोसले आनंद एल. राय, अमिषा पटेल,उर्मिला मातोंडकर,विक्रांत मैसी अशा अनेक सेलिब्रिटींचे अकाऊंट हॅक झाले आहेत.