लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यात मनोरंजनसृष्ट्रीचाही समावेश आहे. शूटिंग बंद झाल्याने अनेक कलाकारांसमोर, पडद्यामागील कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकटं उभी राहिली. मराठी रंगभूमी कलाकार रोहन पेडणेकरवरही सध्या ही वाईट परिस्थिती आली आहे. लॉकडाउनमुळे काम नसल्याने मागील तीन महिन्यांपासून तो घरीच आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी त्याने लघु उद्योग सुरु केला आहे.

रोहनने काही मित्रांच्या मदतीने सुका म्हावरा विकण्याचं काम सुरू केलं आहे. दादर ते बोरिवली मोफत घरपोच सेवा तो पोहचवतोय. मला कोणाकडून उसने पैसे नको पण तुम्ही माझ्याकडून वस्तू विकत घ्या, असं आवाहन तो लोकांना करतोय. यासंदर्भात त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘माझ्या घरी मी, माझी आई आणि सहा महिन्यांचं लहान बाळ आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, पण मी आत्महत्या करणार नाही. कलाकार असलो तरी मी खमका आहे. या परिस्थितीशी मी लढणार आहे. मरणं सोपं आहे पण जगणं कठीण आहे. माझ्या या लढाईत मला तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा करतो’, असं त्याने या व्हिडीओत म्हटलंय.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

रोहनने अलीकडेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत सहस्त्रबुद्धे यांची व्यक्तीरेखा साकारली. त्याने आतापर्यंत अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलंय.