संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता लॉकडाउननंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अनलॉक करताच काही जण वॉकसाठी बाहेर पडले आहेत तर काहीजण कामासाठी. अशाच बॉलिवूड अभिनेते शक्ति कपूर यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये शक्ति कपूर एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये शक्ति कपूर यांनी डोक्यावर एक ड्रम घेतलेला दिसत आहे. त्यांना डोक्यावर ड्रम नेताना पाहून मागून एक व्यक्ती चालत येते आणि त्यांना कुठे चालले असे विचारते. त्यावर शक्ती कपूर यांनी मजेशीर उत्तर दिले आहे . त्यांनी मी दारु आणण्यासाठी चाललो आहे असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे. त्यानंतर ती व्यक्ती संपूर्ण सोसायटीसाठी दारु आणायला चाललात का? असा प्रश्न विचारते.
View this post on Instagram
शक्ती कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 11:46 am