News Flash

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!

मागील वर्षी झाला होता साखरपुडा

भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. ज्वाला दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. अरण्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इवेंटमध्ये विष्णू विशालने याबाबत माहिती दिली. या चित्रपटात विष्णू विशाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 26 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

”लग्नाच्या तारखेविषयी लवकरच कळवेन”

विष्णू विशाल आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ही जोडी स्वत:चे फोटो त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केल्याचे आपण पाहिले आहे. अरण्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इवेंटमध्ये विष्णू विशालने लग्नाच्या योजनांविषयी खुलासा केला. तो म्हणाला, “मी आता तेलगू अलाडू (जावई) बनणार आहे. मला याबद्दल खूप आनंद झाला आहे. लग्नाच्या तारखेविषयी मी लवकरच तुम्हाला कळवेन. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्वाला माझ्या सोबत होती. मी तिचे आभार मानू इच्छितो. कारण, ती माझ्यासाठी तिथे होती.”

गेल्या वर्षी झाला होता साखरपुडा

7 सप्टेंबर 2020 रोजी विष्णू विशालने ज्वालाला तिच्या वाढदिवशी अंगठी घालून साखरपुडा केला होता. “वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्वाला गुट्टा. आयुष्याची नवी सुरुवात. आपण सकारात्मक राहू आणि स्वतःचे, आर्यन, आपले कुटुंब आणि मित्र यांच्या चांगल्या भविष्यासाठी कार्य करू”, असे विष्णूने शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.

2019 पासून या दोघांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मात्र, नवीन वर्षात ज्वालाने तिच्या इंस्टाग्रामवर विष्णूसोबत काही छायाचित्रे शेअर केली आणि विशालला आपला जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे स्पष्ट केले.

दोघेही आहेत घटस्फोटित

ज्वालाने 2005मध्ये बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यामुळे ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर ज्वालाने 29 जून 2011 रोजी पती चेतन आनंदला घटस्फोट दिला. दुसरीकडे, विष्णू विशालही घटस्फोटित आहे. 2011मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केले होते, परंतु 2018मध्ये ही जोडी विभक्त झाली. विष्णू विशाल एक तमिळ अभिनेता आणि निर्माता आहे. काही काळ त्याने क्रिकेटमध्येही आपले नशीब आजमावले आहे. टीएनसीएमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर पायाच्या दुखापतीनंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर 2009मध्ये त्यांने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 1:00 pm

Web Title: actor vishnu vishal and jwala gutta to marry soon adn 96
Next Stories
1 20 वर्षाच्या राधाची टी-20 क्रिकेटमध्ये भन्नाट कामगिरी
2 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियावर झाली मोठी कारवाई
3 अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा
Just Now!
X