15 July 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये मुंबईतील व्हिडीओ शूट करून अभिनेत्री करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन

आर्याने नवीन युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे

सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक नागरिक घरामध्ये अकडले आहेत. या काळात सतत घरात बसल्यामुळे प्रत्येक जण कंटाळला आहे. मात्र अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून न चुकता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अभिनेत्री आर्या वोराने प्रेक्षकांसाठी नवीन युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या चॅनेलला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

‘देवों के देव महादेव’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आर्या वोरा हिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या चाहत्यांसाठी तिने खास नवीन युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून सध्या लॉकडाउनमध्ये मुंबईची परिस्थिती कशी आहे. किंवा सध्याचं वातावरण कसं आहे हे ती दाखवत आहे. त्यामुळे सध्या तिचे हे व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहेत. आर्या ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन, लाइफस्टाइल ब्लॉग्ससाठी प्रसिध्द आहे.

“लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. सोशल मीडियावरून माझ्या शुभचिंतकांनी आणि चाहत्यांनी बराचकाळ मला स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन येण्याविषयी सुचवले होते. शेवटी या लॉकडाउनच्या काळात मी माझे स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन आलीय. चॅनलची सुरूवात एक-दिड महिन्यापूर्वीच झालीय. पण रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय’, असं आर्याने सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 6:43 pm

Web Title: actress aarrya vora new youtube channel ssj 93
Next Stories
1 महिला आरोग्य कार्यकर्त्यांच्या शॉट फिल्मची कमाल; २४ तासांत मिळाले ४० लाख व्हूज
2 विनोदवीर सागर कारंडे लॉकडाउनमध्ये घेतोय ‘हे’ ऑनलाइन धडे
3 करोना संदर्भातील ‘या’ नियमामुळे काही मालिकांच्या प्लॉटमध्येच होणार बदल
Just Now!
X