News Flash

Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

आलिया आणि रणबीर शक्य तितका वेळ एकमेकांसोबत व्यतीत करत असताना पाहायला मिळत आहे. रणबीरच्या कुटुंबियांसोबतचही तिचे चांगलेच सूर जुळले आहेत.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, Alia Bhatt-Ranbir Kapoor

Alia Bhatt-Ranbir Kapoor. बी- टाऊनमध्ये सध्याच्या घडीला बराच चर्चेत असणारा एक विषय म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं रिलेशनशिप. राजी या चित्रपटाच्या यशामुळे तर आलिया प्रकाशझोतात आहेच, पण त्याहूनही जास्त तिच्या खासगी आयुष्यात सध्या सुरु असणाऱ्या घडामोडींवर अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटातून रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रणबीर आणि तिची ऑनस्क्रीन केमिस्टी नेमकी किती लोकप्रिय ठरणार ही पुढची गोष्ट. पण, सध्या मात्र त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीच जास्त गाजतेय. कारण, आलिया आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

आलिया आणि रणबीरच्या याच रिलेशनशिपविषयी तिच्या बहिणीला म्हणजे अभिनेत्री पूजा भट्टला एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पूजाने नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर देत, ‘तुम्ही मला माझ्या खासगी आयुष्याविषयी काहीही विचारा. पण, तुम्ही आलियाच्या खासगी आयुष्याविषयी मला काही विचारु नका आणि मी ते तुम्हाला सांगणारही नाही’, असं स्पष्ट केलं.

पूजाने या विषयावर आपलं ठाम मत मांडत त्याविषयी फार काही माहिती देण्यास नकार दिला. ‘कोणत्या गोष्टीविषयी चर्चा होत आहेत, काय खरं, काय खोट या सर्व गोष्टींमुळे मला काहीच फरक पडत नाही. माझ्यामते आता तिचे (आलियाचे) दिवस सरु आहेत. तिला तिच्या जगण्याचा आनंद घेउद्या. संपूर्ण देशाचं, जगाचं आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजन करण्याचं काम ती अचूकपणे करत आहे. त्यामुळे खासगी आयुष्यात ती काय करतेय आणि काय करत नाहीये हा सर्वस्वी तिचाच निर्णय आहे. आयुष्याच्या वाटेवर कसं पुढे जायचंय हेसुद्धा तिच ठरवेल माझा आणि माझ्या वडिलांचा या गोष्टींडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे आणि तिया या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे तिला तिचं आयुष्य जगू द्यावं’, असं पूजा म्हणाली.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

आलिया आणि रणबीरच्या नात्याविषयी पूजाची भूमिका पाहता तिने या गोष्टीवर फारसं व्यक्त होणं पसंत केलं नसल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान आलिया आणि रणबीर शक्य तितका वेळ एकमेकांसोबत व्यतीत करत असताना पाहायला मिळत आहे. इतकच नव्हे तर रणबीरच्या कुटुंबियांसोबतचही तिचे चांगलेच सूर जुळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:04 pm

Web Title: actress film maker pooja bhatt on alia bhatts relationship with actor ranbir kapoor
Next Stories
1 गुगलवर ‘धडक’च्या सर्चने नेटकरी सैराट
2 ३ लग्न करुनही एकटीच पडली अँजेलिना जोली
3 Dhadak Trailer : कुठे ‘सैराट’ अन् कुठे…., ‘धडक’च्या ट्रेलरविषयी कोण काय बोललं?
Just Now!
X