28 February 2021

News Flash

कंगना रणौतच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स

जावेद अख्तरांनी केला कंगनावर मानहानीचा दावा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स बजावण्यात आला आहे. २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला होता.

एका मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांच्याविषयी भाष्य केलं होतं. कंगनाने आपल्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. डिसेंबर २०२० मध्ये अंधेरी कोर्टात हा दावा दाखल झाला होता. समन्स बजावल्यानंतर येत्या २२ जानेवारीला जुहू पोलीस ठाण्यात कंगनाला चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

आणखी वाचा- सोनू सूदला दणका! मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान देणारी याचिका फेटाळली

आणखी वाचा- ‘मिर्झापूर-2’ मागील वादाचं ग्रहण कायम; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

काय आहे प्रकरण?
एका मुलाखतीत कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्याविषयी भाष्य केलं होतं. अभिनेता हृतिक रोशनविरोधात काहीही बोलू नये यासाठी जावेद अख्तर यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं कंगनाने या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद अख्तर यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. तसंच विविध मुलाखतीत तिने आपली बदनामी केल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 9:00 am

Web Title: actress kangana ranaut summoned by mumbai police in javed akhtar defamation case ssj 93
Next Stories
1 “शुटिंग दरम्यान बोल्ड सीन देताना सेटवर प्रत्येक व्यक्ती…”, सनीने केला खुलासा
2 ‘तांडव’ विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल
3 …म्हणून ‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांनी दिलं ‘त्या’ संस्थेला एक दिवसाचं मानधन
Just Now!
X