News Flash

ताणमुक्तीची तान : डिटॉक्स, स्पा आणि प्राण्यांसोबत विरंगुळा

माझा ताण घालवण्यासाठी मला डिटॉक्स आणि स्पा हे पर्याय अधिक भावतात.

मयुरी देशमुख , अभिनेत्री

मयुरी देशमुख , अभिनेत्री

माझा ताण घालवण्यासाठी मला डिटॉक्स आणि स्पा हे पर्याय अधिक भावतात. तीन-चार दिवसांच्या या डिटॉक्स प्रक्रियेमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पुन्हा उत्सर्जित होण्यास मदत होते. उत्साह वाढतो. डिटॉक्स प्रक्रियेसाठी एखाद्या ठिकाणी गेल्यावर या चार दिवसात मला लिखाण करायला आवडते. एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी मी फक्त सात्त्विक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेते आणि माझे लिखाण करते हा माझ्यासाठी ताणमुक्तीचा उत्तम पर्याय आहे. ताणामुक्तीची ही प्रक्रिया नेमकी किती दिवसांवर अवलंबून आहे यावर सगळ्या गोष्टी ठरतात.

मला एखाद्या गोष्टीचा ताण त्वरित हलका करायचा असल्यास चांगली कलाकृती पाहणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरते. चित्रपट किंवा नाटक पाहायला जाणे मला यावेळी सोईचे वाटते. याशिवाय प्राण्यांबरोबर खेळणे, त्यांच्या सान्निध्यात राहणे यासारखा ताणमुक्तीचा उत्तम मार्ग नाही. मी माझ्या घरी श्वान पाळलेला आहे. लिखाण आणि अभिनय ही कसरत असते. माझे ‘डिअर आजो’ हे नाटक जेव्हा रंगभूमीवर येण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा प्रचंड दडपण आले होते. या नाटकात माझे लिखाण होते आणि अभिनयही करायचा होता. एरवी फक्त अभिनय करताना केवळ तेवढीच जबाबदारी आपल्यावर असते. मात्र या नाटकाच्या लेखनाचीही जबाबदारी माझ्यावर असल्याने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, आपल्याला जो विषय मांडायचा आहे, तो प्रेक्षकांपर्यंत पोहचेल का, संजय मोनेंबरोबर आपली भूमिका कशी वठेल यामुळे नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी ताण जाणवला होता. अशा वेळी आपण या महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर जाऊन ताणापासून मुक्ती मिळवू शकत नाही. आपल्यासमोर पर्याय नसतो. यावेळी दैनंदिन योगा, प्राणायाम, ध्यानधारणा महत्त्वाची ठरते. हे दोन पर्याय आपल्याला तात्पुरते का होईना पण ताणमुक्तीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक आणि मानसिक समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.

नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी मी समतोलित नक्की होते. मात्र मनात कुठेतरी भीती होती. पहिला प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांनी आपले लिखाण स्वीकारल्यावर माझा या कामाबद्दलचा सगळा ताण दूर गेला होता. म्हणूनच आपण करत असलेल्या कोणत्याही कामात अनेकदा संयम आणि आपल्या कुटुंबाचा आधारही तितकाच महत्त्वाचा असतो. काम करत असताना केवळ त्यातून यश अपेक्षित करत नसतील तर हा ताण कमी जाणवतो.

मला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला आवडतात. एखादी मुलाखत ऐकायला मला आवडते. पूर्वी एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक बाजारात आल्यावर मी खरेदी करायचे आणि वाचायचे. आता मी पुन्हा वाचन सुरू केले आहे. इंग्रजी जास्त वाचते. वृत्तपत्रांच्या पुरवणीत आलेले लेख वाचते. या सगळ्यातून त्वरित ताण हलका होतो.

शब्दांकन – किन्नरी जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 12:47 am

Web Title: actress mayuri deshmukh how to manage and reduce stress
Next Stories
1 सेल्फ सव्‍‌र्हिस : फोटोफ्रेमची देखभाल
2 न्यारी न्याहारी : गुलगुले
3 यो यो .. हँडसम
Just Now!
X