News Flash

Ganesh Utsav 2018 : पाहा, गणरायासाठी प्रिया बापटची स्वरसाधना

तिचा हा अंदाज चाहत्यांनाही भावला असून

प्रिया बापट

मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री प्रिया बापटचंही नाव येतं. प्रियाने अगदी बालपणापासूनच अभिनय विश्वात तिची कला दाखवून दिली होती. अशी ही प्रिया सोशल मीडियावर पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधून जात आहे. निमित्त आहे, गणेशोत्सवादरम्यान तिने पोस्ट केलेले काही व्हिडिओ.

सध्या सुरु असणारी गणेशोत्सवाची धूम पाहता प्रियाने गणपची विशेष असं कॅप्शन देत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्या फोटोंमध्ये तिने आपली गायनकला सादर केली आहे. ‘शुक्रतारा मंद वारा…’ आणि ‘दो नैना और…’ अशी गाणी तिने सादर केली आहेत. गणपती म्हणजे कलाधिपती. अशा या बाप्पाचरणी प्रियाने एका वेगळ्याच पद्धतीने आपली सेवा अर्पण केल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

प्रियाने पोस्ट केलेले हे व्हिडिओ पाहून अभिनयासोबतच ती गायनकलेतही निपुण असल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांनाही भावला असून, कमेंटबॉक्समध्ये अनेकांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गणरायाच्या साक्षीने प्रियाने सादर केलेली ही गाणी पाहता तिची ही स्वरसाधना बाप्पाचरणी नक्कीच पोहोचली असणार यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 11:59 am

Web Title: actress priya bapat ganehotsav 2018 sung song watch video ganapati festival
Next Stories
1 अमेयनं दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का?
2 ‘राजी’ दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटात दीपिका?
3 ‘मेड इन चायना’मध्ये राजकुमार रावसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री
Just Now!
X