01 October 2020

News Flash

कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

अभिनेत्रीविरोधात शेजाऱ्यांनी देखील केली तक्रार

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री रॉनी हॉक हिला कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. या २० वर्षीय अभिनेत्रीविरोधात तिच्या बॉयफ्रेंडने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने काही पुरावे देखील सादर केले. या पुराव्यांच्या आधारावर लॉस एंजेलिस पोलिसांनी रॉनीविरोधात गुन्हा दाखल केला व तिला अटक केली. परंतु अटक होताच पुढच्या तीन तासांमध्ये १० हजार अमेरिकी डॉलर्सच्या जात मुचलक्यावर तिला जामीन मिळाला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रॉनी एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पोलिसांनी या तरुणाचं नाव जाहिर केलेलं नाही. टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ३१ जुलै रोजी शुक्रवारी सकाळी रॉनीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन तिच्याबाबत तक्रार केली होती. ती शेजाऱ्यांसोबत सतत भांडण करते, त्यांना मारण्याच्या धमक्या देते, असे आरोप तिच्यावर केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना ती आपल्या बॉयफ्रेंडला देखील त्रास देत असल्याची माहिती समोर आली. या तरुणाच्या अंगावर काही जखमा होत्या व पायाला देखील दुखापत झाली होती. याबाबत आणखी चौकशी केली असता रॉनी आपल्या बॉयफ्रेंडला देखील त्रास देत असल्याची माहिती समोर आली. अखेर कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली. परंतु अटक होताच १० हजार अमेरिकी डॉलर्सच्या जात मुचलक्यावर तिने जामीन मिळवला. पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत.

रॉनी हॉक एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘फाऊंड’ या १० मिनिटांच्या शॉट फिल्ममधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘डिस्ने स्टक इन द मिडल’ या टीव्ही मालिकेत ती झळकली. या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. नेटफ्लिक्सवरील ‘ऑन माय ब्लॉक’ या वेब सीरिजमध्ये देखील तिनं काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:34 pm

Web Title: actress ronni hawk arrested charged for domestic abuse mppg 94
Next Stories
1 आत्महत्येच्या एक दिवस आधी सुशांतने केली ‘ही’ गोष्ट
2 नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा, लीलावती रुग्णालयात दाखल
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, जाणून घ्या विजय मल्ल्या कनेक्शन
Just Now!
X