कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊच आणि लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आता अभिनेत्री रोझमंड पाइकचाही समावेश झाला आहे. जेम्स बॉन्ड सीरिजमधील ‘डाय अनदर डे’ या चित्रपटाच्या वेळच्या एका दुर्दैवी प्रसंगाचं तिने कथन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डाय अनदर डे’च्या ऑडिशनच्या वेळी आपल्याला विवस्त्र होण्यास विचारण्यात आलं होतं, असं तिने सांगितलं आहे. अभिनेता पिअर्स ब्रॉसनॅनच्या सोबत मिरांडा फ्रॉस्ट हे पात्र साकारण्याची संधी तिच्या समोर आली होती. ज्याकरता तिच्यासमोर एक आगळीवेगळी मागणी करण्यात आली होती.

या प्रसंगाविषयी ‘अॅमेझॉन्स ऑडिबल सेशन्स’मध्ये बोलताना रोझमंड म्हणाली, ‘मी बॉन्ड सीरिजमधील चित्रपटासाठी पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती. मला चांगलं आठवतंय त्यावेळी, त्यांनी मला विवस्त्र होऊन फक्त अंतर्वस्त्रांमध्ये येण्यास सांगितलं.’

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं पडलेलं महागात – नीना गुप्ता

त्यावेळी पाइक अवघी २१ वर्षांची होती. जेव्हा तिला इव्हिनिंग ड्रेसमध्ये येण्यास सांगण्यात आलं होतं. त्याचवेळी आपण अगदी वेगळ्याच दुनियेत आलो आहोत, याचा अंदाज तिला आला. मुख्य म्हणजे त्या प्रसंगातही आपण, समोरुन करण्यात आलेल्या सर्व मागण्या धुडकावून लावल्या होत्या हेसुद्धा तिने न विसरता सांगितलं. त्या प्रसंगानंतरही तिला सेटवर कोणत्याच प्रकारी भीती वाटली नाही. ज्याचं श्रेय ती बार्बला ब्रोकोली यांना देते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rosamund pike says she was asked to drop her dress during movie die another day audition
First published on: 18-08-2018 at 11:35 IST