01 April 2020

News Flash

बी-टाऊन सेलिब्रिटींसह तंदुरूस्‍त व्‍हा; सोफी चौधरीचा नवा शो ‘वर्क इट अप’ लवकरच

बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार आहेत जे हिट आणि फिट असल्यामुळे ओळखले जातात

बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार आहेत जे हिट आणि फिट असल्यामुळे ओळखले जातात. कलाकारांच्या याच लोकप्रियतेमुळे त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्यातच काही कलाकार असे आहेत जे खासकरुन त्यांच्या फिटनेसमुळे ओळखले जातात. यात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी असे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे या कलाकार मंडळींचा नक्की फिटनेस फंडा काय असतो असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होतात. हेच प्रश्न आता उलगडणार आहेत. अभिनेत्री, मॉडेल सोफी चौधरी लवकरच तिच्या आगामी शोमधून कलाकारांचा फिटनेस फंडा दाखवणार आहे.

सोफीचा ‘वर्क इट अप’ हा शो लवकरच सुरु होणार असून यामधून बॉलिवूड सेलिब्रिटींचा फिटनेस फंडा, त्याचा आहार आणि त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत.  वूट आणि टिकटॉकच्या संयुक्त विद्यमाने #EduTok अंतर्गत या शोची संकल्‍पना मांडण्‍यात आली आहे. हा शो #EduTok अंतर्गत भारताचा पहिला चॅट शो असणार आहे.

वूटच्‍या ‘फिट अप विथ द स्‍टार्स’ला मिळालेल्‍या प्रचंड लोकप्रियतेनंतर हा नवीन अनोखा चॅट शो फिटनेस नित्‍यक्रमाला सादर करतो आणि तुमच्‍या लाडक्‍या सेलिब्रिटीजची चमक दाखवून देतो.  ”फिटनेस हा माझ्या जीवनाचा महत्‍त्‍वपूर्ण भाग आहे. मी व्‍यायाम, नृत्‍य किंवा माझ्या डिटॉक्‍स चहामधून देखील आरोग्‍यदायी जीवनशैली अवलंबण्‍याचा प्रयत्‍न करते. ‘वर्क इट अप’ माझ्या दोन आवडत्‍या घटकांना प्राधान्‍य देतो: फिटनेस आणि मित्र. या शोमध्‍ये मी प्रेक्षकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या बॉलिवूड कलाकारांचा फिटनेस नित्‍यक्रम आणि विविध गुपितांबाबत सांगणार आहे. माझे अनेक सेलिब्रिटींसोबत सलोख्‍याचे नाते आहे. मला खात्री आहे की, हा #EduTok चॅट शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासह त्‍यांना आकर्षून घेईल आणि प्रेक्षकांच्‍या मनामध्‍ये आरोग्‍यदायी बदल घडवून आणेल. तंदुरूस्‍त भारत मोहिम उत्‍साहात असताना यासारख्‍या शोसाठी ही योग्‍य वेळ आहे,” असं सोफी म्हणाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 4:46 pm

Web Title: actress sophie chaudhary new show work it up ssj 93
Next Stories
1 ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन
2 या चित्रपटात विकी कौशलचा भाऊ दिसणार दुहेरी भूमिकेत
3 वेब सीरिजवर सेन्सॉरशिप येण्याची शक्यता; प्रसारण मंत्रालयाने शोधला मार्ग
Just Now!
X