News Flash

अभिनेत्री स्पृहा जोशीवर सुके बोंबील भाजण्याची वेळ, ‘हे’ आहे कारण

सेटवर करावं लागतंय हे देखील काम

अभिनेत्री स्पृहा जोशीने आजवर अनेक मालिक आणि सिनेमांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. इतक नाही तर रंगभूमीवर विविध नाटकांमधून तिने नाट्य रसिकांची मनंही जिंकली आहेत. स्पृहा एक उत्तम कवयित्रीदेखील आहे. अनेकदा सोशल मीडियावर ती चाहत्यांसाठी कविता सादर करत असते.

स्पृहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्पृहाने तिचं बालपणीचं एक सिक्रेट शेअर केलं आहे. स्पृहाचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तर काही चाहत्यांनी मात्र हा व्हिडीओ पाहून प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्पृहा सध्या अलिबागमध्ये शूटिंग करत आहे. याचवेळी सेटवर तिने मोकळ्या वेळेत किचनचा ताबा घेतला आणि ती चक्क सुके बोंबील भाजू लागली. गंमत म्हणजे शूटिंगसाठी आणलेल्या बोबलांवरच या कलाकार मंडळींने ताव मारल्याचं तिने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

स्पृहाने सेटवरील किचनचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमधून तिचं सिक्रिट सांगितलं आहे. ” बाहेर शूटिंग सुरु असताना सहकलाकारांसाठी स्वयंपाक करणं सुरू आहे. या सुंदर बाईसोबत स्वयंपाकघर शेअर करणं, हसत खेळत स्वयंपाक करण हा एक अमूल्य अनुभव आहे.” असं तिने लिहलं आहे. यापुढे स्पृहाने सेटवरची गंमत आणि तिची बालपणाची आठवण सांगितली आहे. “अलिबागला शूट करत असताना सुके बोंबील सीनसाठी म्हणून आले होते. आम्ही शूट संपल्यावर त्यांचा फडशा पाडला. माझ्या लहानपणी मी, आई, आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असेच गॅस वर भाजून, तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षानी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. ”

स्पृहाने सेटवर भाजलेले बोंबील खात जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्पृहाच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक मित्र मैत्रीणींनी आम्हालाही बोंबील खायचे आहेत असं म्हंटलं आहे. मात्र काही युजर्सनी ब्राह्मण असून बोंबील खाता असा प्रश्न तिला विचारला आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ या शोच सूत्रसंचालन करताना स्पृहाने बच्चेकंपनीसोबत चांगलीच धमाल केली होती. तर अनेक मालिका आणि सिनेमांमधून स्पृहाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘रंगबाज’ या  हिंदी वेब सीरिजमधील स्पृहाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 5:44 pm

Web Title: actress spruha joshi roasting dry fish for co star on set cooking while shooting kpw 89
Next Stories
1 “उपकार कर आणि शूटिंग बंद कर”, होळीच्या शुभेच्छा देणं अक्षय कुमारला महागात
2 प्रभासने खरेदी केली सहा कोटी रुपयांची नवी कार, पाहा व्हिडीओ
3 ‘बिग बॉस’ने राखीला दिली २५ लाख रुपयांची कार भेट?
Just Now!
X