बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या हटके अंदाजामूळे ओळखली जाते. अदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अदाचे डान्स आणि फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ‘ड्रंक एन हाय’ हे अदाचे नवीन गाण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं आहे. अदाचे हे गाणे नेटकऱ्यांना आवडले असल्याचे पाहायला मिळाले. आता या गाण्यावर अदा आणि तिची आजी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अदाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अदा आणि तिची आजी दिसत आहे. अदाने काळ्या रंगाचे हूडि आणि चष्मा घातला आहे तर अदाच्या आजीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर जॅकेट आणि चष्मा घातला केला आहे. अदाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आता पर्यंत ६५ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
View this post on Instagram
अदाचे हे गाणे २९ जानेवारीला प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत ९४ लाख पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. हे गाणं संगीतकार मेलो डी आणि आस्था गिल यांनी गायलं आहे.
दरम्यान, अदा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती एका शॉर्ट फिल्म आणि तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तिने ‘1920’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले. अदाने ‘हंसी तो फसी’,’कमांडो 3′ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 6:53 pm