बॉलिवूड अभिनेता आणि गायक अध्ययन सुमनने आत्महत्या केल्याच्या अफवा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. आता अध्ययनने या सर्व अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अध्ययनचे वडिल आणि अभिनेते शेखर सुमन यांनी यावर प्रतिक्रिया देत अफवांना पूर्णविराम दिला होता. अध्ययनने आत्महत्या केल्याच्या अफवा त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला असल्याचे खुद्द अध्ययनने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
‘माझ्या आईपर्यंत मी आत्महत्या केल्याच्या अफवा पोहोचल्या तेव्हा तिला धक्काच बसला. त्यांनी मला फोन केला. पण मी एका मीटिंगमध्ये असल्यामुळे त्यांचा फोन उचलू शकलो नाही’ असे अध्ययन सुमन म्हणाला. पुढे तो म्हणाला, ‘जर मी आत्महत्या केली असती तर आता माझे भूत तुमच्याशी बोलत आहे असे मला वाटते.’
View this post on Instagram
अध्ययन सुमनने सोशल मीडियावर देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नमस्कार मी अध्ययन सुमन. मला अनेक लोकांचे मेसेज आले. मी एकदम ठिक आहे. काळजी करु नका. माझ्या आयुष्यात कोणतेही मोठे संकट आले तरी मी इतके टोकाचे पाऊल उचलणार नाही. मला देवाने जे काही दिले आहे त्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानतो. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या करणे हा पर्याय नाही. पण माझ्या विषयी ज्या बातम्या देण्यात आल्या त्या फार चुकीच्या होत्या. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल. पण तुम्हा सगळ्यांचे आभार तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते’ असे अध्ययन सुमन म्हणाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 4:19 pm