चित्रपट निर्माते प्रकाश झा यांची आश्रम २ ही वेब सीरिज अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत झळकला असून गेल्या कित्येक दिवसापासून ही सीरिज चर्चेत आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. यामध्येच अभिनेत्री आदिती पोहनकर हिची भूमिका विशेष गाजली. मात्र, ही भूमिका साकारण्यापूर्वी आदितीने प्रचंड मेहनत घेतल्याचं तिने ‘आजतक’च्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“प्रकाश झा यांनी माझं आधीचं काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली आणि तुला महिला पहेलवानाची भूमिका साकारता येईल का असा प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नावर मी क्षणाचाही विलंब न करता हो नक्कीच मला जमेल असं म्हणत होकार दिला. या भूमिकेसाठी मला माझं वजन वाढवायचं होतं. मी पूर्णत: शाकाहारी आहे. त्यामुळे मला वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली”, असं आदितीने सांगितलं.

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
navi mumbai, 12 year old boy killed
शरीर सूखासाठी १२ वर्षीय बालकाचा खून, नवी मुंबई पोलिसांनी १६ तासांत मारेकऱ्याला ताब्यात घेतले

पुढे ती सांगते, “या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी तब्बल ८ किलो वजन वाढवलं होतं. सेटवरदेखील प्रकाश जी यांचं कायम लक्ष असायचं. अभिनय असो किंवा कलाकार घेत असलेली मेहनत असो प्रकाशजींचं कायम त्याकडे लक्ष असायचं”.

दरम्यान, या सीरिजमध्ये आदितीने एका महिला पहेलवानाची भूमिका साकारली आहे. सोबतच या सीरिजसाठी ती खास हरियाणवी भाषा शिकली. ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.