24 November 2020

News Flash

…म्हणून नेहासोबत फ्लर्ट करायचो; आदित्य नारायणने केला खुलासा

'या' कारणामुळे नेहा-आदित्यच्या अफेअरची रंगली होती चर्चा

बॉलिवूडमध्ये चित्रपटासोबतच सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कायमच चर्चा रंगत असतात. त्यात त्यांचे अफेअर, ब्रेकअप या चर्चा नव्या राहिल्या नाहीत. मध्यंतरी गायिका नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. खरंतर नेहाने अलिकडेच रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. तर आदित्यदेखील लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे. मात्र, मध्यंतरी नेहासोबत सुरु असलेल्या अफेअरच्या चर्चांवर आदित्यने मौन सोडलं आहे.

अलिकडेच झालेल्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आदितने हिमेश रेशमिया व विशाल ददलानी यांच्यासोबत हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने नेहासोबत फ्लर्ट का करत होतो किंवा तिच्यासोबत अफेअरच्या चर्चा का रंगल्या याविषयी भाष्य केलं.

“मी फक्त नेहासोबत फ्लर्ट केलं असं नाही. तर ज्यावेळी मी कोणत्याही शो होस्ट करतो, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो त्यावेळी मी परिक्षकांसोबत मुद्दाम फ्लर्ट करतो. त्यामुळे नेहासोबत फ्लर्ट करण्याचं काही खास कारण नव्हतं. ते मी सहज दरवेळी करतो त्यामुळे तिच्यासोबतदेखील केलं. यापूर्वी मी अलका याज्ञिक यांच्यासोबतदेखील फ्लर्ट केलं होतं. मात्र, माझे वडील मला ओरडले होते”, असं आदित्यने सांगितलं.

आणखी वाचा- ‘ट्रोल करणं थांबवा अन्यथा…’; नेहासोबतचा तो व्हिडीओ पाहून हिमांश कोहली संतापला

दरम्यान, इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोचं आदित्य नारायण सूत्रसंचालन करत होता. तर नेहा परिक्षकाची भूमिका बजावत होती. मात्र, या काळात नेहा व आदित्यच्या अफेअरच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. परंतु, नेहाने रोहनप्रीतसोबत लग्न करुन या चर्चांना पूर्णविराम दिला. तर आदित्यनेदेखील मस्करीचा भाग म्हणून नेहासोबत फ्लर्ट करत होते असं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 11:05 am

Web Title: aditya narayan reveals to kapil sharma why he flirted with neha kakkar on a reality show ssj 93
Next Stories
1 मलायकाने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, रिकामी बाटली द्या अन्…
2 “हे तर आरक्षणाचे दुष्परिणाम, जेव्हा योग्यता नसलेली व्यक्ती…”; कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य
3 अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची पुन्हा होणार चौकशी?
Just Now!
X