News Flash

…म्हणून आदित्यने घेतला सोशल मीडियापासून ब्रेक

सोशल मीडियापासून दूर जाण्यामागे काय असेल कारण?

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता आदित्य नारायण याच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य लवकरच श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबत असलेल्या नात्यावर कबुली दिली होती.

श्वेता आणि आदित्य दोघांच्याही घरी लग्नाची धावपळ सुरु झाली असून आदित्यने काही काळ सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली.

“लवकरच आम्ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत. ११ वर्षांपूर्वी मला माझा जीवनाचा साथीदार मिळाल. त्यामुळे मी खरंच स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. आम्ही दोघांनाही आमच्या आयुष्यातील गोष्ट स्वत: पूरत्या मर्यादित ठेवायला आवडतात. खासगी आयुष्य हे खासगीच असावं असं आम्हाला वाटतं. सध्या लग्नाची तयारी करायची आहे. त्यामुळे काही काळ सोशल मीडियापासून दूर जातोय. भेटूयात डिसेंबरमध्ये”, अशी पोस्ट आदित्यने शेअर केली आहे.

आदित्य हा प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. तर आदित्य प्रेयसी श्वेता एक अभिनेत्री असून तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदित्य-श्वेताची भेट शापित चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 2:03 pm

Web Title: aditya narayan to tie the knot with shweta agarwal in december dcp 98
Next Stories
1 ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, स्पर्धकाला हरताना पाहून अमिताभ बच्चन देखील झाले दु:खी
2 कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? शाहरुखच्या प्रश्नावर ऐश्वर्याची गुगली
3 ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल
Just Now!
X