अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं जात आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने देखील या मक्तेदारीविरोधात आवाज उठवला. सुशांतप्रमाणे संगीत क्षेत्रातील कलाकारही आत्महत्या करतील अशी भीती त्याने व्यक्त केली. त्याच्या या विधानाला संगीतकार अदनान सामी याने देखील पाठिंबा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

The Indian Film & Music Industry SERIOUSLY needs a ‘Herculean‘ SHAKE UP. Especially in the context of music, New Singers, Veteran Singers, Music Composers & Music Producers – who are being exploited to the HILT!! “Fall into the DICTAT or you’re OUT”… Why is creativity beyond “CONTROLLED” by those you have no clue about ‘creativity’ & are trying to play GOD?? We have 1.3 Billion people in India by the grace of God- Is all that we have to offer is ‘remakes’ & ‘remixes’? For God sake, STOP THIS & allow the truly talented new & veteran artistes BREATH & give you creative peace Musically & Cinematically!!! Have you, the Movie & Music ‘Mafia’ who have arrogantly entitled yourselves as the ‘self professed & self appointed gods‘ not learned anything from history that you can NEVER control art & the ecosystem of creativity of any field? ENOUGH!! MOVE OVER!! “CHANGE” is here & it’s knocking on your door!! Ready or Not, it‘s coming in! Brace yourselves! As Abraham Lincoln said – “You can fool some of the people some of the time, but you cannot fool all the people all the time!!”

A post shared by Adnan Sami (@adnansamiworld) on

अदनान सामी याने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात मक्तेदारी करणाऱ्या कंपन्यांविरोधात आवाज उठवला आहे. “भारतीय फिल्म आणि संगीत क्षेत्रात आता मोठे बदल होणं गरजेचं आहे. काही मुठभर लोक या क्षेत्रांवर राज्य करणाचा प्रयत्न करतात. नव्या कलाकारांचे शोषण करतात. आपल्या देशात कोट्यवधी कलाकार आहेत. मात्र आपण प्रेक्षकांना रिमिक्स गाण्यांशिवाय काय देतोय?” अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

यापूर्वी काय म्हणाला होता सोनू निगम?

सोनू निगम याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नव्या कलाकारांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले आहेत.