News Flash

‘मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज होईन, पण….’

कपिल शर्मा सध्या अस्वस्थ असल्यामुळे तो 'फॅमिली टाइम विथ कपिल' या शोमध्येसुद्धा आपलं योगदान देत नाहीये.

कपिल शर्मा

विनोदवीर कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडी शोसाठी किंवा अफलातून विनोदी शैलीसाठी चर्चेत नसून भलत्याच कारणांनी तो प्रकाशझोतात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या कालावधीनंतर कपिलने ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. पण, त्याच्या नव्या शोपेक्षा एका वेगळ्या वादामुळे कपिल सर्वांचं लक्ष वेधतोय.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी कपिलने अनेकांचा रोष ओढवला. पण, त्याचवेळी सहकलाकारांनी या कठीण प्रसंगात त्याची साथ दिल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान, कपिलच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला. कपिल शर्मा सध्या अस्वस्थ असल्यामुळे तो ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ या शोमध्येसुद्धा आपलं योगदान देत नाहीये. परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने काही वेळ मागितल्याचं कळत आहे.

वाचा : ‘त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’, अलीला पाहून कपिल ढसाढसा रडला

‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कपिलने काही गोष्टी स्पष्ट केल्या. ‘मला थोडा वेळ हवा आहे. येत्या काळात माझ्याकडे काही अफलातून प्रोजेक्ट्स येणार आहेत. गेल्या काही काळापासून मी खूप जास्त काम करत आहे. मी जे करतोय ते मला आवडतंय. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईन हे नक्की पण, मला फक्त मला थोडा वेळ द्या’, असं कपिल चाहत्यांना उद्देशून म्हणाला. कपिलचं हे वक्तव्य चाहत्यांमध्ये त्याच्याप्रती एक आशेचा किरण देऊन गेलं आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आता अडचणीच्या परिस्थितीवर मात करण्यात कपिल यशस्वी होतो का, याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 4:00 pm

Web Title: after a big controversy comedian kapil sharma promise to come back again
Next Stories
1 Bigg Boss Marathi: कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवा कॅप्टन?
2 एप्रिलमध्येच वरुणच्या ‘ऑक्टोबर’ला ग्रहण; मराठी चित्रपटावरून कॉपी केल्याचा आरोप
3 मी शाहरुखचा ‘स्वदेस’ पाहिलाच नाही- आमिर खान
Just Now!
X