News Flash

फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्यावर बायोपिक; अजय देवगण मुख्य भूमिकेत

'बधाई हो' चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

अजय देवगण

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्डच सुरू आहे. त्यातही क्रीडा विषयावरील बायोपिक असल्यास प्रेक्षकांकडून त्याला अधिक पसंती मिळते. क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांवरील चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजले. आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

१९५०- १९६३ या कालावधीत सय्यद अब्दुल रहिम भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुग मानला जातो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी अब्दुल रहिम यांचं कॅन्सरमुळेनिधन झालं.

वाचा : ‘लुका छुपी’ ठरला कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशी दमदार कमाई करणारा चित्रपट

मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनगुप्ता करत असून अद्याप त्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. अजयसोबतच या चित्रपटात आणखी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 1:32 pm

Web Title: after badhaai ho director amit sharma to begin sports biopic on syed abdul rahim starring ajay devgn
Next Stories
1 अतुल कुलकर्णी दिसणार ‘या’ वेब सीरिजमध्ये
2 ‘ती फुलराणी’मध्ये मोहन आगाशे यांची एण्ट्री
3 ‘लुका छुपी’ ठरला कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशी दमदार कमाई करणारा चित्रपट
Just Now!
X