News Flash

सोनू सूदसाठी चाहत्याचं नवरात्री व्रत; उपवास करणाऱ्या फॅनला सोनू म्हणाला…

सोनू सूदचं हे ट्वीट सोशल मीडियावर झालं व्हायरल...

गेल्या वर्ष भरापासून गरजूंच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देवदूता सारखा धावून आला होता. सोनूने सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं. सगळ्यांसाठी धावून आलेल्या या सोनूला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना तर एक धक्काच बसला होता. त्याची प्रकृती लवकरच बरी व्हावी यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, त्याच्या एका चाहत्याने तर सोनूसाठी नवरात्रीचे उपवास धरल्याची माहिती समोर आल्यानंतर सोनूने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूच्या या चाहत्याचे नाव प्रवीण कुमार आहे. प्रवीनने ट्वीट करत याची माहिती दिली. ‘जेव्हा आपण अशा व्यक्तीला मदत करतो जो फक्त पैशाने गरीब आहे, तेव्हा आपण त्याच्यासाठी देवाचं दुसरं रूप असतो. सोनू सूद तुमची प्रकृती बरी नसल्याचं कळलं म्हणून नवरात्रीचे उपवास करत आहे’, असे ट्वीट प्रवीण कुमारने केले आहे.

चाहत्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोनूने त्याला उत्तर दिले आहे. सोनू म्हणाला, ‘पप्पू भाई व्रत माझ्यासाठी नाही तर देशातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करा. माझ्यापेक्षा देशातील अनेक लोकांना तुमच्या प्रार्थनेची अधिक गरज आहे.’

सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून १७ एप्रिल रोजी त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यात त्याने होम क्वारंटाईन असल्याचे देखील सांगितले होते. काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं देखील त्याने सांगितले होते.

सोनू गेल्या वर्षभरापासून गरजू लोकांना मदत करत आहे. सोनूने कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यापासून, मुलाच्यां शिक्षणापर्यंत अनेक गोष्टीं केल्या आहेत. एवढंच नाही तर आता सुद्धा बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषध गरजूंना मिळवून देण्यासाठी सोनू प्रयत्न करत आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 2:00 pm

Web Title: after knowing that a fan is fasting for his good health sonu sood reply him conutry needs it more dcp 98
Next Stories
1 मेसेज बॉक्समध्ये नेटकऱ्यांचे विचित्र प्रश्न; “इतके छोटे कपडे का घातले?” विचारणाऱ्याला फातिमा म्हणाली..
2 सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचं निधन
3 Dance Video: माधुरी दीक्षित की नोरा फतेही? ठरवा तुम्हीच
Just Now!
X